28.8 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्र५३ रुग्ण मिळताच मुंबई महानगरपालिका प्रशासन अलर्ट

५३ रुग्ण मिळताच मुंबई महानगरपालिका प्रशासन अलर्ट

मुंबई : मुंबईत पुन्हा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात ५३ कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले आहेत. तसेच कोरोनाच्या संक्रमणामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती यापूर्वीच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोगाचा आजार होता तर दुस-याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभागाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत देखरेख सुरू केली आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. परंतु मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना घाबरू नका, परंतु काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

मुंबईतील रुग्णालयात बेड राखीव
मुंबईत कोरोनाच्या उपचारासंदर्भात सर्वोत्तम सुविधा असल्याचे अधिका-यांनी सांगितले. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये २० बेड आहेत. तसेच बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड आहेत. कस्तुरबा रुग्णालयात अतिदक्षता विभागात २ बेड आणि १० बेडचा वॉर्ड आहे. तसेच गरज पडल्यावर या रुग्णालयामधील क्षमता वाढवली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR