30.7 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीय६,२१० कोटीचा कर्ज घोटाळा उघड; ‘युको’च्या माजी अध्यक्षाला अटक

६,२१० कोटीचा कर्ज घोटाळा उघड; ‘युको’च्या माजी अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेडसह इतरांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या कोलकाता विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार सुबोधला अटक केली.

सुबोध गोयल यांना कोलकाता येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने २१ मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

६,२१० कोटीचा गैरवापर केल्याचा आरोप
गोयल यांच्यावर ६,२१०.७२ कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ईडीचे म्हणणे आहे की, तपासात असे दिसून आले की, सुबोध कुमार गोयल यांच्या यूको बँकेचे अध्यक्ष आणि एमडी म्हणून कार्यकाळात यूको बँकेने सीएसपीएलला मोठी कर्जे मंजूर केली होती, जी नंतर बँकेने इतरत्र वळवली. या बदल्यात गोयलला लाच म्हणून मोठी रक्कम मिळाली.

बनावट कंपन्यांचा वापर
लाचेचे पैसे लपविण्यासाठी गोयलने रिअल इस्टेट, लक्झरी वस्तू, हॉटेल बुकिंग इत्यादींसाठी बनावट कंपन्यांचा वापर केल्याचा आरोपही आहे. गोयलच्या आधी ईडीने डिसेंबर २०२४ मध्ये सीएसपीएलचे प्रवर्तक संजय सुरेका यांना अटक केली होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. इतकेच नाही तर ईडीने संजय सुरेका आणि सीएसपीएल यांच्या सुमारे ५१० कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR