21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र६७ वर्षांत राज्यात ४६१ महिला आमदार, यंदा ३६३ जणी आखाड्यात!

६७ वर्षांत राज्यात ४६१ महिला आमदार, यंदा ३६३ जणी आखाड्यात!

पुणे : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांनी सभागृहात प्रतिनिधित्व केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३६३ महिला उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मतदारांचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ महिलांचे होते. मात्र, २०१९ साली मतदार यादीत हे प्रमाण ९२५ पर्यंत कमी झाले. यानंतर महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामुळे २०२४ मध्ये हे प्रमाण ९३६ वर पोहोचले.

या निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ आहे, तर पुरुष मतदारांची संख्या ५ कोटी २२ हजार ७३९ इतकी आहे. महिला मतदारांचा टक्का जवळपास ५०% आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

महिला आमदारांचे प्रमाण पहिल्या विधानसभेपासून सातत्याने चढ-उताराचे राहिले आहे. पहिल्या विधानसभेपासून आतापर्यंत सर्वाधिक महिला आमदार पहिल्याच कार्यकाळात निवडून आल्या, तर नंतरच्या काळात हे प्रमाण ३० च्या आतच राहिले आहे.

पहिल्या विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार
महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत (१९५७-१९६२) सर्वाधिक ३० महिला आमदार होत्या. त्यानंतर १९७२-७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ महिला आमदार होत्या. २०१९-२४ च्या चौदाव्या विधानसभेत २७ महिला आमदारांचा सहभाग होता. मात्र, १९९०-९५ च्या आठव्या विधानसभेत केवळ ६ महिला आमदारनिवडून आल्या होत्या, जी संख्या सर्वात कमी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR