पंचसुत्रीच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेसला विजयी करा

देवणी : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिक केंद्रंिबदू मानून आम जनतेच्या विकासासाठी काँग्रेसच्या हाताची आम जनतेला साथ राहिली आहे. विधानसभेच्या चालू निवडणुकीत काँग्रेसने आपली पंचसूत्री जाहीर केली आहे. महालक्ष्मी, समानतेची हमी ,कृषी समृध्दी, कुटुंब रक्षण व युवकांना शब्द या पंचसुत्रीतून  महाराष्ट्राचा विकास साधला जाणार आहे.
यासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन कर्नाटकचे मंत्री तथा बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंड्रे यांनी देवणी येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले.महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ  शनिवारी देवणी येथे सभा पार पडली. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जेष्ट नेते मल्लिकार्जुन मानकरी, हमीद शेख, विजयकुमार पाटील, माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, उमेदवार अभय साळुंके,अरंिवद भातांब्रे, बस्वराज पाटील नागराळकर, संजय शेटे, अंबादास जाधव, पंकज शेळके, दिलीप पाटील नागराळकर, अजित माने, पंडीत धुमाळ, धर्माजी सोनकवडे, अविनाश रेश्मे, मंहमंदरफी सय्यद, अजित बेळकोणे, यांची प्रमुख उपस्थिती होती
सेवेचे व्रत चालुच राहील : साळुंके 
उतणार नाही मातणार नाही. घेतला वसा मी टाकणार नाही.या निवडणुकीचा निकाल काहीही असो पण जनसेवेचे घेतलेले व्रत चालुच राहील असे अभिवचन काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांनी व्यक्त केले. शेतकरी, कष्टकरी, यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसला मतदान करा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला ७ हजारांचा भाव मिळणार असल्याचे सुतोवाच यावेळी करताच मतदारांनी टाळ्याचा कडकडाट केला.
दलित नेत्याचा अपमान समाजबांधव सहन करणार नाहीत : शृंगारे
माझ्या खासदारकीच्या काळात व गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माझा अपमान विद्यमान आमदारांनी वेळोवेळी केला ,माझी पिळवणूक केली. दलित पुढे जाऊ नये त्यांची भावना असावी म्हणून त्यांनी माझ्याशी असे वर्तन केले. घडली हकीकत मी आता समाजापुढे ठेवत आहे. समाज बांधव आता माफ करणार नाहीत. त्यांचा राग मतपेटीतून दिसेल, असा विश्वास माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news