27.1 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीय८२३ यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर पोलिसांच्या रडारवर!

८२३ यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर पोलिसांच्या रडारवर!

हेरगिरी । ११ जणांना अटक; संवेदनशील मुद्दे उघडकीस, तपास सुरू; ‘आयएसआय’ सदस्य सक्रीय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एकूण ११ लोकांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आता युट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. एकट्या पंजाबमधील ८२३ यूट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्सवर पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. ज्यांच्या यूट्यूब चॅनेल्स आणि ब्लॉग्सवर पाकिस्तानशी संबंधित कंटेंट आहे आणि जो शेजारी देशांमध्ये अधिक पसंत केला जातो, अशा कंटेंटची आता पोलीस तपासणी करणार आहेत.
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. पाकिस्तानशी लागून असलेली पंजाबची ५५३ किमी लांब सीमा असलेल्या भागात अनेक लष्करी तळे आणि संवेदनशील ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांची माहिती जर सार्वजनिक झाली, तर ती राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका ठरू शकते. त्यामुळे आता पोलीस त्यांच्या पातळीवर या यूट्यूबर्स आणि ब्लॉगर्सची चौकशी करत आहेत, असं गौरव यादव यांनी सांगितलं.
२०१९ मध्ये करतारपूर कॉरिडॉरचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते. पोलिसांनी हिसार येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कांचीही चौकशी सुरू केली आहे, जिच्यावर गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. २०१९ मध्ये देशभरातील अनेक मोठे यूट्यूबर्स आणि ट्रॅव्हल ब्लॉगर्स करतारपूरमध्ये आले होते. तपास यंत्रणांच्या अहवालात अनेक संवेदनशील मुद्दे समोर आले असून, यावर काम सुरू आहे.
१२१ सोशल मीडिया अकाऊंट्स बंद
पंजाब पोलिसांनी १० एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १२१ सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. हे अकाऊंट्स परदेशात असलेल्या गँगस्टर्स आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित पोस्ट्समधून माहिती शेअर करण्यासाठी आणि संवादासाठी माध्यम म्हणून वापरले जात होते. यात पाकिस्तानस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख हरविंदर सिंग उर्फ रिंदा, हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासियन, जीवन फौजी, अनमोल बिश्नोई, गोल्डी बरार आणि इतर गँगस्टर्सचे सोशल मीडिया अकाऊंट्स समाविष्ट होते. पंजाब पोलिसांनी हे अकाऊंट्स बंद केल्यावर अहवालात महत्त्वाची नोट लिहिली होती. पाकिस्तानी एजन्सी ‘आयएसआय’चे सदस्य या अकाऊंट्सवर सक्रीय होते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी पंजाब पोलिसांनी ४८३ सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले होते, जे गँगस्टर्सशी संबंधित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR