17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा सर्वांची इच्छा

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा सर्वांची इच्छा

पुणे : प्रतिनिधी
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याचे काही निश्चित होत नाही. अशातच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा असल्याचे सांगितले. २४५ व्या महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथील महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी रुपाली चाकणकर यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यातील सर्वच जनतेला उत्सुकता आहे की, महायुतीकडून कोण मुख्यमंत्री होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीला गेले असून, आज यावर चर्चा होणार आहे.

आज किंवा उद्यापर्यंत कोण मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होईल, असा मला विश्वास आहे. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला भरघोस यश दिले आहे. आताच नाही तर पहिल्यापासून आमची मागणी आहे की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असे यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR