नांदेड : प्रतिनिधी
देगलूर उपविभागीय पोलिसांनी मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून अवैधरीत्या गांजा बाळगून विक्री करणा्नैया एका इसमास ताब्यात घेतले. या कारवाईत १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा आणि १२५ ग्रॅम वजनाची गांजाची हिरवी रोपे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गांजाची शासकीय किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मुखेड तालुक्यातील उंद्री, पं.दे. येथील आरोपी सुधाकर संतुकराव वडजे याच्या घरी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पथकाने झडती घेतली. घराच्या अंगणातील एका ठिकाणी वाळलेल्या गांजाचे शेंडे व चुरा तसेच गांजाची हिरवी रोपे आढळून आली. वजन केल्यानंतर वाळलेला गांजा १ किलो ११५ ग्रॅम, तर हिरव्या गांजाच्या रोपांचे वजन १२५ ग्रॅम भरले.
या प्रकरणी सुधाकर संतुकराव वडजे याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात ्न एनडीपीएस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर किरण पोपळघट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक चिंताबर कामठेवाड, पोउपनि अभिजीत तुतुरवाड, पोलीस अंमलदार रविंद्र भुले, अमोल सुंडगे, प्रविण कुरे तसेच पोउपनि म्हैसनवाड, पोलीस अंमलदार विशाल आटकोरे, माधव मरगेवाड आणि महिला पोलीस अंमलदार रिहाना शेख यांचा समावेश होता.
















