आता प्र्रतिक्षा अनुदानाची

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात मंगळवार दि. २७ मे रोजी लातूर शहर व परिसरात अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या अतिवृष्टीने लातूर शहरात अवघ्या दोन तासांतच हाहाकार उडाला. या पावसामुळे शहराच्या विविध भागांतील सुमारे ४०० नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तू भिजल्याने नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. याकरीता याकरीता महसूल विभागाने तलाठ्यांचे पथक कार्यरत केले आहे. पंचनामे जवळपास पुर्ण झाले असून आता प्रतिक्षा अनुदानाची आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या ९ मे पासून कमी-अधिक प्रमाणात बेमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी दुपारी पडलेल्या दोन तासांच्या पावसाने लातूर शहरात दाणादाण उडवून दिली. सर्व रस्ते जलमय झाले होते.  घराघरात पाणी गेले. अनेकांच्या गृहोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. शहरातील सुमारे ४०० नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरुले. शहरातील इस्लामपुरा भागातील सुमारे ८०,  खाडगाव रस्ता भागातील १०, मोहननगरमधील ८०, उस्मानपूरामधील २०, सम्राट चौकातील २०, कोल्हेनगरमधील २०, अशा सुमारे ४०० घरांमध्ये अतिवृष्टीमुळे गटारीचे पाणी घरात शिरले होते.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या सहकार्यासह मंगळवारी सायंकाळी अडचणीतील नागरिकांची भेट घेऊन पाहणी केली. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी  यांनी मदत करण्यास सुरुवात  केली.  बुधवारी दिवसभर नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येत होत्या. भर पावसात महानगरपालिकेच्या अधिका-यांनी पाणी शिरलेल्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील पाणी काढण्याच्या सूचना केल्या. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे केले असून आता प्रतिक्षा आहे ती अनुदानाची.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news