आमचं काम हेच उत्तर

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विरोधकांच्या टीकेला उत्तर
जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित 
लातूर : प्रतिनिधी 
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळच नाही. आम्ही केलेलं काम हेच आमचं उत्तर आहे. पारदर्शक नोकरभरती हेच आमचं उत्तर. शेतकरी, बचत गट, मजूर संस्था, पतसंस्था एकही घटक जिल्हा बँकेच्या मदतीपासून वंचित राहिला नाही. काय केले ते सर्वांसमोर ठेवले, पुढील पाच वर्षांत काय करणार आहोत हेही समोर ठेवले. अज्ञानी विरोधकांनी कशात आनंद मानायचा ते त्यांनी ठरवावे, अशा शब्दांत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहकार पॅनलचा जाहीरनामा माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते. यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, यशवंतराव पाटील, अभय साळुंके, शिवानंद हेंगणे, कल्याण पाटील, आशाताई भिसे, स्नेहल उटगे, स्वयंप्रभा पाटील, सुभाष घोडके यांच्यासह सहकार पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
सहकारात सहमतीचे राजकारण केले 
३७ वर्षांच्या प्रवासात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेले काम सर्वांसमोर आहे. जिल्ह्यात सहकारामध्ये काम करताना सहमतीचे राजकारण केले. जिल्ह्याच्या विकासात सहमती हे आमचे सूत्र आहे. शेतकरी, सामान्यांचे जगणे सुस  झाले पाहिजे, यासाठीच सहमतीने एकत्र आलो. मी आणि बाबासाहेबांनी लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणली आणि लातूर जिल्हा बँकेतही तसेच काम करून जिल्हा बँक राज्यात नावारुपाला आणली. ही बँक जपण्याची जबाबदार मतदारांची आहे. जबाबदारी विचारपूर्वक पार पाडा, सहकार पॅनलच्या पंधराच्या पंधरा जागा निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
शिट्टीवर प्रचंड मतदान करून 
विरोधकांची शिट्टी वाजवा 
यावेळी बोलताना बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख म्हणाले, विरोधक जाणिवपूर्वक बेछूट आरोप करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. परंतु मतदार सुज्ञ आहेत. लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळ कोणाच्या हाती द्यायची हे मतदार चांगले ओळखून आहेत. येत्या १५ नोव्हेंबर रोजी सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांच्या शिट्टी या चिन्हावर प्रचंड मतदान करून विरोधकांची शिट्टी वाजवा, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांचे खोटे बोल 
पण रेटून बोल सुरूय
विरोधकांना सहकारच माहीत नाही. निलंगा तालुक्यात सोसायट्या किती, बिगर कर्जदार सभासद किती आहेत, हेही माहीत नाही, ते लोक विरोधाला विरोध करून खोटं बोल पण रेटून बोल, असे सुरू आहे. तुम्हाला सहकारातील काहीही माहिती नाही आणि तुम्ही बँक चालवायला निघालात, अशा शब्दांत समाचार घेत अशोकराव पाटील निलंगेकर यांनी  जिल्हा बँक चालली तर सोसायट्या टिकतील आणि सोसायट्या टिकल्या तरच शेतकरी टिकणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन केले.
पुढील ५ वर्षांचा 
विकासाचा संकल्प 
* महिला बचत गटांसाठी सुलभ कर्ज सुविधा
महिला बचत गटांना रु. १०० कोटींची तरतूद तसेच बचत गटातील महिलांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी रु. २ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्जपुरवठा करणार.
* गावागावांत मायक्रो एटीएम 
व आधार-सक्षम बँकिंग सेवा 
गावागावांत मायक्रो एटीएम आणि आधार-सक्षम पेमेंट प्रणाली सुरू करून शेतकरी सभासद व निराधार व्यक्तींना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे.
* बँकेचा व्यवसाय व नफा वाढविणे 
जिल्हा मध्यमर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय रु. १५,००० कोटींपर्यंत नेणे, वार्षिक नफा रु. १०० कोटींच्या स्तरावर कायम ठेवणे तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून त्यांचा आर्थिक परतावा वाढविणे.
* डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन कर्ज सुविधा 
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत शेतकरी सभासदांना डिजिटल प्रणाली, व्हिडिओ केवायसी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने ऑनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
* सर्व शेतकरी सभासदांना कर्ज योजनांचा लाभ 
एक लाख नवीन कर्जदार सभासद जोडणे व नव्याने सभासद झालेल्या सर्व शेतक-यांना पीककर्ज तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठीच्या विविध कर्ज योजनांचा लाभ उपलब्ध करुन देणे.
* मजूर संस्थांसाठी सुलभ कर्जप्रक्रिया
मजूर संस्थांना कर्ज उपलब्ध करुन देताना सातबारा उता-याची अट शिथिल करुन कर्जप्रक्रिया अधिक सुलभ करणे.
* बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी
बेरोेजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच विविध महामंडळाच्या अनुदानाधारित आणि प्रोत्साहनपर कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
* बँक तिथे स्वत:ची इमारत संकल्पना 
बँक तिथे स्वत:ची इमारत या संकल्पनेअंतर्गत ज्या ठिकाणी बँकेची शाखा आहे. त्या ठिकाणी बँकेच्या मालकीची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणे.
* प्रत्येक तालुक्यात नवीन बँक शाखा
बँकेच्या सेवा अधिक व्यापक करण्यासाठी आणि ग्राहकांना सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे
* शुभमंगल कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज 
शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
* विद्यार्थ्यांसाठी व्यापक शैक्षणिक कर्ज सुविधा 
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा समावेश शैक्षणिक कर्ज योजनेत करणे.
* विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संपूर्ण संगणकीकरण 
जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संपूर्ण संगणकीकरण करून त्यांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करणे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38

Latest news