लातूर : प्रतिनिधी
शहरातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून शहाळ्याची आवक वाढत असल्याने त्याच्या दरात मात्र घसरन होत आहे. शहरातील बाजारात विक्रीसाठी येणा-या शहाळ्याची आवक ही बेंगलोर, तामिळनाडू, चेन्नई, केरळ, आंध्र प्रदेश येथून होत असल्याचे व्यापारी रेहान बागवान यांनी सागीतले आहे. आरोग्यदायी शहाळ्यांना वाढत्या उन्हामुळे चांगली मागणी आहे.
केरळ आणि आंध्र प्रदेश येथील शहाळ्यांचे कवच पातळ असतात ते कडक उन्हामुळे ही शहाळी तडकण्याची शक्यता असते. मात्र याउलट चेन्नई येथून येणारी शहाळी कडक असल्याने त्यांची आवक व्यवस्थित होत आहे. सध्या बाजारात आठ दिवसाला चार ते पाच ट्रक भरुन माल येत असल्याचे विक्रीत्यांनी सांगितले. परंतु सध्या तापमानात वाढ झाली नसल्याने शहाळ्यांची मागणी सर्वसाधारण आहे. सध्या बाजारात आवक मुबलक प्रमाणात होत असल्याने शहाळ्याला २५ ते ३० रुपये भाव मिळत आहे. मार्च नंतर शहाळ्याच्या दरात वाढ होत असते. उन्हाच्या चटका वाढत जाईल तसा भाव वाढत असतात त्यामुळे यंदा शहाळ्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गानी वर्तवली आहे. शहाळ्याच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर पोषक तत्त्वे, पोटासंबंधी आजार असो अथवा बद्धकोष्टता यासाठी नारळ पाणी पिण्याने या समस्या दूर होतात. पचनशक्ती वाढते. तसेच रक्तदाबावर नियंत्रणासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होत असतो.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथून नारळ विक्रीसाठी महाराष्ट्रात आणले जातात. तसेच दक्षिण भागातील विविध राज्यांतून येणारा नारळ मुंबईत दाखल होतो आणि तो पुढे आसपासच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जातो. यंदा नारळाचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहाळ्याच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. जवळपास एक महिन्या नंतर दरात वाढ होतील असे व्यापा-यानी सागीतला आहे.