19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरआष्टीतून सुरेश धस, लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना संधी

आष्टीतून सुरेश धस, लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना संधी

भाजपची तिसरी बहुप्रतिक्षीत यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना जाहीर करण्यात आली आहे. २५ उमेदवारांच्या यादीमध्ये ज्या जागांसाठी भाजप अंतर्गत व महायुतीच्या मित्रपक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू होती त्या जागांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघासाठी जोरदार रस्सीखेच चालू होती.

त्यात सुरेश धस यांनी बाजी मारली असून भाजपने तिस-या यादीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. लातूर शहर मतदारसंघातही भाजप अंतर्गत इच्छुकांची जोरदार रस्सीखेच सुरू होती. बसवराज पाटील मुरुमकर, देवीदास काळे, अजित पाटील-कव्हेकर, प्रेरणा होनराव यांनीही उमेदवारासाठी जोर लावल्याची चर्चा होती. मात्र, अखेर भाजपने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावरच डाव लावण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेडच्या देगलूर मतदार संघात अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक जितेश अंतापूरकर यांनी उमेदवारी मिळविण्यास यश प्राप्त केले आहे. या जागेसाठी रिपाई आठवले गट प्रयत्नशील होता. आर्वी मतदार संघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीयसहाय्यक सुमित वानखेडे यांना, तर वर्साेवा मधून भारती लव्हेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तिस-या यादीमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आला असून विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतूक हंबर्डे यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.

भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर २२ उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामुळे, भाजपने १४६ उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचे दिसून आले.

भाजपच्या तिस-या यादीमध्ये माळशिरसमधून पुन्हा एकदा राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. राम सात पुते यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या होत्या, या पराभवानंतर आता त्यांना भाजपकडून माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे.

साकोली – अविनाश ब्राह्मणकर
सावनेर – आशिष देशमुख
आर्वी – सुमित वानखेडे
कारंजा – सई डहाके
वर्सोवा – भारती लव्हेकर
मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
तिवसा – राजेश वानखडे
मोर्शी – उमेश यावलकर
काटोल – चरणसिंग ठाकूर
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिल्ािंद माने
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राजू तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगलूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्रेहा दुबे
बोरिवली – संजय उपाध्याय
घाटकोपर पूर्व – पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर – अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलूस कडेगाव – संग्राम देशमुख

भाजपाने तिस-या यादीत बोरिवलीचे आमदार सुनील राणेंचा पत्ता कट केला. त्यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना भाजपने उमेदवारी दिली. घाटकोपरमधूनही पराग शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली. काटोलमधून इच्छुक असणारे आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उतरवण्यात आले.
 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR