23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडालिलावात ऋषभ पंत ठरला सर्वांत महागडा खेळाडू

लिलावात ऋषभ पंत ठरला सर्वांत महागडा खेळाडू

आयपीएलची बोली, संघांनी अवघ्या १२ खेळाडूंवर खर्च केले १८०.५ कोटी रुपये

मुंबई : प्रतिनिधी
आयपीएल मेगा लिलाव २०२५ मध्ये सर्व १२ मार्की खेळाडू विकले गेले. काहींसाठी आरटीएम कार्ड वापरण्यात आले तर काहींना दुस-या फ्रँचायझीकडून मोठी रक्कम देण्यात आली. आयपीएल २०२४ चा विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघात सामील झाला तर दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार लखनौ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला.

त्याचवेळी गेल्या मोसमात एलएसजीचा कर्णधार असलेला के. एल. राहुल यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. या मोसमात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरला. पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. संघांनी १२ खेळाडूंवर १८०.५ कोटी रुपये खर्च केले.

ऋषभ पंत या हंगामातीलच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यरला पंजाबकिंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला. या यादीत तिसरे नाव अजूनही मिचेल स्टार्कचे आहे, ज्याला गेल्या वर्षी केकेआरकडून २४.७५ कोटी रुपये मिळाले होते. मात्र, यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. डीसीने त्याला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतले.

मार्की प्लेयरच्या पहिल्या सेटमध्ये अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने आरटीएमद्वारे १८ कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यरलाही पंजाबने विकत घेतले. गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटींना खरेदी केले. ऋषभ पंत लखनौला तर मिचेल स्टार्क दिल्लीत सहभागी झाला. कागिसो रबाडाला गुजरातने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. मार्की प्लेयरच्या दुस-या सेटमध्ये मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने १० कोटींमध्ये विकत घेतले.

डेव्हिड मिलरवर लखनौने ७.५० कोटी रुपये खर्च केले. युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने १८ कोटींना विकत घेतले. मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन ८.७५ कोटी रुपयांना आरसीबीमध्ये सामील झाला. के. एल. राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींना विकत घेतले.

चहलवर पैंशाचा पाऊस
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा लिलावात उतरला होता. ज्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली, पण दुस-या टोकाकडून गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली.

तसेच पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातशी टक्कर झाली. त्याचवेळी लखनौनेही उडी घेतली. पंजाबने चहलसाठी १४ कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली. अखेर पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली. त्यामुळे तो आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR