32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसोलापूरइंग्रजी पाटी विरोधात मनसेचे गांधीगिरी पद्धतीचे आंदोलन

इंग्रजी पाटी विरोधात मनसेचे गांधीगिरी पद्धतीचे आंदोलन

सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलापुरात इंग्रजी पाटी विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर देखील मराठी पाट्या न बनवल्यास खळ-खट्याक आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

मागील तीन महिन्यापूर्वी मनसेच्या वतीने खळ-खट्याक आंदोलन करत मराठीत पाट्या बनवा असे व्यापा-यांना आवाहन करण्यात आले होते. तरीही सोलापुरातील काही व्यापा-यांनी अद्याप मराठीत पाट्या न बनवल्याने आज गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

आजच्या आंदोलनानंतर देखील व्यापा-यांनी मराठीत पाट्या न बनवल्यास निवडणुकीनंतर खळ-खट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय. व्यापा-यांनी देखील या आंदोलनालाप्रतिसाद देत लवकरच पाट्या बनवण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जिल्हाअध्यक्ष विनायक मंिहद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, राहुल अक्कलवाडे, वैभव रंपुरे, यश मंिहद्रकर, हनमंतु घंटे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR