36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरतुळजापूर रोडवरील कचरा डेपोस आग

तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस आग

सोलापूर : तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोस अचानक आग लागली आहे काल मोठा वारा असल्याने रात्रीपासून ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. येथील एकूण ५४ एकरांपैकी सुमारे २० एकर परिसर या आगीने पेटला आहे.आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ६० गाड्या पाणी फवारणी केली आहे.

तुळजापूर रोडवर महापालिकेचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व कचरा या डेपोमध्ये संकलित करण्यात येतो. या डेपोला काल सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. रात्री मोठ्या प्रमाणात वारे असल्याने ही आग पसरत गेली, अशी माहिती महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली.

आजीच्या घटनेची माहिती समजताच तत्काळ आग लागण्याची माहिती समजताच अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे पथक तत्काळ दाखल झाले. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. येथील सुमारे २० एकर परिसर या आगीने पेटला आहे. यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत. चारही बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत साधारणता: ६० गाड्यांनी पाणी फवारणी करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे हे या ठिकाणी तळ ठोकून आहेत. दिवसभरात सुमारे ३० ते ४० टँकर पाण्याचा मारा करण्यात आला.

दरम्यान, घटनास्थळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. आग विझवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस अचानक आग लागली. बघता बघता आग धुमसत आहे. या कचरा ढिगामध्ये मिथेन हा वायू असतो. हा मिथेन वायू साधारण ४० ते ४३अंश सेल्सिअस तापमानामध्ये पेट घेतो. सोलापूर शहरातील तापमान वाढत आहे. सोलापुरातील तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके होते. अधिक तापमानामुळे कच-यातील मिथेन वायू पेट घेतो. यामुळेच ही आग लागली. ती आग धुमसतच आहे, हे शास्त्रीय कारण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR