15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रइम्तियाज जलील यांना धक्का, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

इम्तियाज जलील यांना धक्का, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
निवडणुकीच्या निकालाच्या आधीच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप पदाधिका-यांच्या तक्रारीवरून जलील यांच्यावर गुरुवारी (ता. २१) रात्री उशिरा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी इम्तियाज जलील आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे हे पंडित नेहरू महाविद्यालयातील बूथवर आपसात भिडले होते. यानंतर शेंडगे यांनी गुरुवारी रात्री उशिरा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार जलील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरू असताना इम्तियाज जलील हे १५ ते २० जणांसह तेथे आले. त्यांनी मतदारांना धमकावण्यास सुरू केले. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता मला जातीवाचक शिवीगाळ करून अंगावर धावून आले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित लोकांनी मला सोडवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR