35.1 C
Latur
Tuesday, March 11, 2025
Homeराष्ट्रीयउज्जैनमध्ये भरदिवसा, भर रस्त्यावर अत्याचार

उज्जैनमध्ये भरदिवसा, भर रस्त्यावर अत्याचार

संवेदना बोथट, मदतीऐवजी काढला व्हीडीओ
उज्जैन : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भरदिवसा, भर रस्त्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंबंधी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणानंतर मध्य प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठताना दिसत आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील कोयला फाटक या भागातील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. बलात्काराची ही घटना घडत असताना आजूबाजूचे कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी गेले नाहीत. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला. उज्जैनमध्ये ही घटना घडत असताना लोक फक्त व्हीडीओ काढत होती. त्या महिलेच्या मदतीला कोणीही गेले नसल्याने लोकांमधील संवेदनांना काय झाले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

उज्जैनच्या कोयला फाटक भागात एका महिलेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ दुपारचा आहे. फूटपाथवर एक तरुण उघडपणे एका महिलेवर बलात्कार करत होता. यावेळी काही लोक तेथून गेले. त्यांनी व्हिडीओही बनवला. पण महिलेला मदत केली नाही. ही महिला मजूर असून ती कोल गेट परिसरातून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाने तिला अडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR