उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी ‘हा’ मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय.सोमवारी त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु कोणत्याही चर्चेतून त्यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फारसे निर्णय घेता आले नाहीत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार २.० मध्ये पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेला संघर्ष कायम आहे. मंगळवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही त्याचा परिणाम दिसून आला. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

सोमवारी त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु कोणत्याही चर्चेतून त्यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फारसे निर्णय घेता आले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री व्हायचे होते. पण नाशिकचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले.

त्याचप्रमाणे शिवसेना (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे होते. पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष (अजित पवार) आणि खासदार सुनील तटकरे यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे. शिंदे यांच्या नाराजीमुळे फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला. पण पालकमंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेले भरत गोगावले हे सुनील तटकरेंवर उघडपणे हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वादांचे सावट दिसून आले. बैठकीत अटल सेतूवरील टोल वसुलीसह काही मुद्यांवरच चर्चा होऊन निर्णय घेता आला.

मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे अनुपस्थित
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजले नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा दिवसभर मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात रंगली होती. शिंदे दिवसभर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news