छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज शुक्रवारी मतदान पार पडले. सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान जालना जिल्ह्यात झाले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत अनुक्रमे ६१.८१ ते ६१.५८ टक्के मतदान झाले. अन्य जिल्ह्यातही ५५ ते ५८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. एकूणच मराठवाड्यात सरासरी ५९.६८ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान जालना जिल्ह्यात पार पडले.
जिल्हा मतदानाची टक्केवारी
संभाजीनगर : ५५.७३ टक्के
जालना : ५९.८१
परभणी : ६१.८१ टक्के
हिंगोली ६१.८१ टक्के,
नांदेड : ५९.८१ टक्के
बीड ५९.६८ टक्के मतदान झाले.
पुणे पदवीधरसाठी ६२.७८ टक्के मतदान
पुणे : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत पदवीधर मतदार संघात ६२.७८ टक्के तर शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के मतदान झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी डाव-प्रतिडाव टाकल्याने अधिक चुरस पाहायला मिळाली. परंतु मतदानाची टक्केवारी वाढल्याने कोण कुणावर मात करणार, हे २७ ऑक्टोबर रोजी जाहीर होणा-या निकालात स्पष्ट होणार आहे.
पदवीधर मतदारसंघ
पुणे जिल्हा — ६१.४७ टक्के
सोलापूर जिल्हा — ७१.४२
सातारा जिल्हा — ६६.९२
सांगली जिल्हा — ५५.६२
कोल्हापूर जिल्हा — ६३.८३
शिक्षक मतदार संघ
पुणे जिल्हा — ७८.०८ टक्के
सोलापूर जिल्हा — ८९ टक्के
सातारा जिल्हा — ८९.३९
सांगली जिल्हा — ८७.८३
कोल्हापूर जिल्हा — ८८.६२.
















