टोकिओ : वृत्तसंस्था
जपानमध्ये एकटे राहाणा-या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. जपान पोलिसांनी २००४ च्या पहिल्या सहा महिन्यात देशात झालेल्या मृत्यूंच्या संख्येसंबंधी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार जपानमध्ये ६ महिन्यात तब्बल ४०,००० लोकांचा त्यांच्या राहत्या घरात एकटे असताना मृत्यू झाला.
राष्ट्रीय पोलिस एजन्सीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये तब्बल चार हजार लोक असे होते. ज्याचे मृतदेह मृत्यूच्या एक महिन्यांहून अधिक काळानंतर उजेडात आले. तर १३० लोकांचे मृतदेह तर एक वर्षभर त्यांच्या घरांमध्ये सडत पडून होते. या लोकांच्या मृतदेहाची विल्हेवाट तब्बल एक वर्षानंतर लावण्यात आली.
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सध्या जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त वृद्ध लोक आहेत. त्यामुळे एकटे राहणा-या लोकांची संध्या वेगाने वाढत आहे. दरम्यान जपान पोलिसांच्या रिपोर्टमधून आता वयस्कर लोकांची एकटे राहण्याबद्दल तसेच मृत्यूबद्दल अधिकची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
एकांतात मृत्यू होणा-यांमध्ये सर्वाधिक वृद्ध
राष्ट्रीय पोलिस एजन्सीच्या २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार एकटे राहणारे ३७,२२७ लोक मृतावस्थेत आढळले. यामध्ये ७० टक्के लोक हे ६५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे होते. मृत्यू झालेल्या ४० टक्के लोकांचे मृतदेह एक दिवसाच्या आत आढळले होते. तर ३,९३९ मृतदेह एक महिना तर १३० मृतदेह एक वर्षांपर्यंत बेपत्ता होते.