25.8 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeमहाराष्ट्रएमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील गँ्रट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एमबीबीएसच्या तिस-या वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याचा मृतदेह कॉलेज हॉस्टेलमध्ये आढळला. या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हॉस्टेलमध्ये अशी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये रविवारी (८ जून) रात्री उशिरा एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. या विद्यार्थ्याचे नाव रोहन प्रजापती असे आहे. हॉस्टेलमध्ये एका रूममेटला रोहन मृतावस्थेत आढळला. या रूममेटने हॉस्टेलच्या वॉर्डनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वॉर्डनने पोलिसांना संपर्क केला.

पोलिसांनी रोहनला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जेजे मार्ग पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा अहवाल दाखल केला आहे. रोहनने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत. रोहनचा मृत्यू का आणि कसा झाला याचा शोध जेजे मार्ग पोलिस घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR