26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांना मोफत प्रवास !

एसटी कर्मचा-यांना मोफत प्रवास !

चालक, वाहकांना कुटुंबासह करता येणार चार महिने कुठेही प्रवास

गोंदिया : प्रतिनिधी
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत, त्याचप्रमाणे, चालक, वाहकांसाठीही मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याचा एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. आधी कर्मचा-यांना वर्षभरात फक्त दोन महिने जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना आता वर्षभरात चार महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर एसटी महामंडळाने कर्मचा-यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने एसटी कर्मचा-यांना आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचा-यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पहिले सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसरे सत्र जुलै ते डिसेंबरमध्ये एक महिन्याचा असा एकूण दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता एका सत्रात दोन महिने, असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे. एसटी कर्मचा-यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळेल.

२ महिने महामंडळाकडून परिपत्रक जारी
या अगोदर वाहक, चालकांना वर्षभरात केवळ दोन सत्रांत दोन महिने मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ही सुविधा फक्त कर्मचा-यांसाठी
मोफत पास सुविधा फक्त एसटी महामंडळातील कर्मचा-यांसाठी आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचा-यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळणार आहे. यामुळे चालक, वाहक व त्यांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे.

दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पास
एसटी विभागाकडून आधी जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता या सुविधेत मोठी सुधारणा करत, एका सत्रात दोन महिने असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR