मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र ऐश्वर्याने एका पोस्टद्वारे घटस्फोटाच्या अफवांचे खंडन केले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला २० एप्रिल रोजी १८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
लग्नाच्या वाढदिवशी ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चन व लेक आराध्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिघांच्या चेह-यावर आनंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. याच दरम्यान, या जोडप्याला एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लग्नापूर्वी ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्यासोबत नाव जुळलं होतं. तर अभिषेकचेही राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत सुत जुळल्याची चर्चा होती. अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडादेखील झाला होता, मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तिथेच तुटलं होतं. त्यानंतर जानेवारी २००७ अभिषेकने मध्ये झालेल्या ‘गुरु’ सिनेमाच्या प्रीमिअरनंतर ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. अखेर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय २० एप्रिल २००७ रोजी लग्नबंधनात अडकले.