शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पयीनशिप ग्रामीण टी-१० स्पर्धेच्या तालुकास्तरीय सामन्यात रोमांचकारी लढती झाल्या.अत्यंत अतितटीच्या झालेल्या शेवटच्या सामन्यात राजमुद्रा क्रिकेट क्लब कांबळगा संघाने विजय मिळविला तर ताऊ क्रिकेट क्लब भिंंगोली संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील लढती क्रिकेट प्रेमी तरुणांना खिळवून ठेवणा-या ठरल्या.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील शिवनेरी महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील २६ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. यात राजमुद्रा क्रिकेट क्लब कांबळगा व ताऊ क्रिकेट क्लब भिंगोली यांच्या दरम्यान अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये कांबळगा संघ अजिंक्य ठरल्याने थेरगाव संघाला प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये तर द्वितीय आलेल्या भिंगोली संघाला ३१ हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक व सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. हे सामने शिवनेरी महाविद्यालय शिरूर आनंतपाळ येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेस डॉ सेलचे जिल्हाध्यक्ष अरंिवंद भातांब्रे, माजी सभापती अजित माने, तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, संयोजक अॅड.सुतेज माने, चेअरमन रामकिशन गड्डीमे, शहराध्यक्ष अशोक कोरे, नगरसेवक सुधीर लखनगावे, जनार्दन पाटील, दत्तात्रय भोसले, अमोल कामगुंडा, ज्ञानेश्वर पाटील, वल्लभ भंडे, यश दुरुगकर,
केशव मादलापुरे, खेळाडू, तालुक्यातील पदाधिकारी व युवक उपस्थित होते.