23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरकिरकोळ भाजीपाला विकें्रत्यांवर नियंत्रण कोणाचे? ग्राहकांची होतेय लुट 

किरकोळ भाजीपाला विकें्रत्यांवर नियंत्रण कोणाचे? ग्राहकांची होतेय लुट 

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापुर्वी पडलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार सुरु आहेत. मात्र किरकोळ बाजारात ग्राहकांची मोठी लूट सुरु झाली आहे. पावसाचे कारण पुढे करत जवळपास सर्वच भाज्यांचे दर दुप्पट वाढविण्यात आले आहे. या दरवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहक भरडून निघत आहेत. बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाज्यांचे दर किलोमागे २०  ते ३० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत भाज्यांची आवक महिनाभरापूर्वी घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. काही काळानंतर भाज्यांची आवक स्थिरावल्याने घाऊक बाजारातील दर नियंत्रणात आले आहेत. राज्यातील विविध भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक ५० टक्क्यांनी मंदावली आहे. घाऊक बाजारात काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी किरकोळ विके्रते मात्र बाजार भावाच्या दुप्पट दराने भाज्यांची विक्री करु लागले आहेत. शहरातील बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कोबी किरकोळ विक्रिते ६० रुपयांना विकत आहेत.
३० ते ४० रुपये किलो या दराने मिळणा-या पत्ता गोभी, गवार, भेंडी, वागें, टमाटे, पालक, कोथींबीर, वरणा, शिमला मिरचीच्या दरांनी तर किरकोळीत साठी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता. मात्र आता भाजीपाल्यांची आवक वाढून बाजारभाव स्वस्त झाले असताना देखील शहरातील बाजार व हातगाड्यांवर सर्वसामान्य ग्राहकांची लूट केली जात आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या भेंडी, टोमॅटो, दोडका, भोपळा, गवार, भेंडी, वागें, टमाटे, पालक, कोथींबीर वरणा, शिमला, मिरची यांना प्रति किलोमागे जो बाजारभाव मिळतो त्या बाजारभावाच्या दुप्पट दराने काही हातगाडीधारक तसेच बाजारातील भाजीपाला विक्रिते विक्री करीत आहेत. भाजापाल्याच्या प्रतिकिलोसाठी किमान दर असला तरी किरकोळ बाजारात त्यापैक्षा दुप्पट दराने विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR