40 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeलातूरकिल्लारी-मातोळा मार्गावर गोमांस घेऊन जाणारा टेम्पो जप्त

किल्लारी-मातोळा मार्गावर गोमांस घेऊन जाणारा टेम्पो जप्त

किल्लारी : वार्ताहर
धारशिव जिल्ह्यातील एका सतर्क नागरिकाने धाराशिव येथून हैद्राबादकडे गोमांस घेऊन एक आयशर टॅम्पो जात असल्याची माहिती पोलिसांना ११२ क्रमांकावरून दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागरिकाच्या मदतीने सदरील वाहन किल्लारी- मातोळा मार्गावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांनी गोमांसास १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मातोळा-किल्लारी मार्गे गोमांस घेऊन (एम.एच.२०-सी.टी.-९८५६) क्रमांकाचे आयशर टॅम्पो जात होता. याची माहिती किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे  यांना (दि.६) मार्च रोजी रात्री मिळाली होती. मातोळा-किल्लारी मार्गावरील हसलगण,मातोळा ,नांदुर्गा व लोहटा येथील काही परिचयाच्या नागरिकांना सदरील संशयित टॅम्पो थांबवून ठेवण्यास सांगितले यानुसार संबंधित गावातील काही तरुणांनी संबंधित आयशर टेम्पो हसलगण-मातोळा मार्गावर रात्री ९. ३० वाजता अडवून ठेवला यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक ढोणे, आबासाहेब इंगळे, रवी करके, दत्ता जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत सदरील टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित मांस निदर्शनास आले.
या प्रकरणी टॅम्पो किंमत अंदाजे ४ लाख रुपये व त्यामध्ये प्राण्यांचे मांस १० टन प्रति किलो १५० रु प्रमाणे १५ लाख असा एकूण १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी आकरम अनवर नाईकवाडे, आदनान काझी, इमरान पठाण (सर्व रा. धाराशिव ता.जि. धाराशिव) यांच्या विरोधात  किल्लारी पोलिस ठाण्यात दत्तात्रय जाधव यांच्या फिर्यादीवरून सीआर नंबर ६८/२०२५ कलम ३२५ बीएनएस व सह कलम ५,५(अ)(१),५(ए)(२),५ (बी),५(सी)९,९(ए) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६  प्रमाणे किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आकरम अनवर नाईकवाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR