33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरकॉर्नर बैठकीच्या माध्यमातून डॉ. काळगे यांना मतदाराचा वाढता पाठिंबा 

कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून डॉ. काळगे यांना मतदाराचा वाढता पाठिंबा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १५ येथे निपुण शेंडगे यांचा निवासस्थानी बैठक घेण्यात आली.  या बैठकीला संजय निलेगांवकर, परिवहन समिती माजी सदस्य संजय  सुर्यवंशी, माजी नगरसेवक विजय धन्ना, शेंडगे व या भागातील महिला पुरुष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संजय निलेंगावकर महणाले काँगेस पक्षाने एक चांगला उच्चविद्याविभूषित व सुसंस्कृत उमेदवार दिलेला आहे, सुशिक्षित बेरोजगारांना ३० लाख नोक-या देण्याचे आश्वासन काँगेस पक्षाने आपल्या वचननाम्यात दिले आहे.  येणा-या ७ मे रोजी आपल्याला डॉ. काळगे यांना विजयी करायचे आहे. या वेळी संजय सूर्यवंशी यांनिही मार्गदर्शन केले आभार निपुण शेंडगे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR