नांदेड : प्रतिनिधी
अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत रविवारी मराठा समाजाची बैठक झाली. यात राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघातून एक उमेदवार उभा करण्याचे ठरविण्यात आले. ३० मार्चपर्यत उमेदवार निश्चित होणार आहे, यामुळे नांदेडमधून कोैन बनेगा जरांगे यांचा उमेदवार या चर्चेला उधान आले आहे.
अंतरवेली सराटी जालना येथे रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत एक व्यापक बैठक घेतली. या बैठकीत चर्चा करून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाचा एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३० मार्चपर्यंत उमेदवार निश्चित केला जाणार आहे. खास करून भाजपाच्या उमेदवारांविरूद्ध ही लढत असेल असे बोलले जात आहे परंतू याची झळा कोणत्या उमेदवाराला पोहचणार याची उत्सुकता लागली आहे. नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर तर काँग्रेसमधून वसंतराव चव्हाण यांची यांची उमेदवारी निश्चित झाली असून दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. अद्याप अन्य पक्षाचा ओबीसी तथा अन्य उमेदवार ठरला नाही. मात्र आता मराठा समाजाने जरांगे पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे एक उमेदवार उभा करण्याच हालचाली सुरू केल्या आहे. सोबतच जरांगे यांची टिम कोणत्या समाजाचा उमेदवार देतील याची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावातून बैठका होत असून सवार्नुमते एका उमेदवारांची निवड होणार आहे. ३० मार्च पर्यंत सदर उमेदवार उमेदवारांची निश्चित करण्यात होणार असून मराठा समाजाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अंतरवेली सराटी ते झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत चर्चा करून सर्वांना मते उमेदवार उभा करण्यात येईल, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अंतरवेली सराटी येथे नादेड जिल्हयातून मोठा जनसमुदाय बैठकीला उपस्थित होता. रविवारी सकाळी ११वाजल्यापासून बैठक सुरू झाली दुपारी ३ च्या दरम्यान बैठक संपली . या बैठकीत ठरल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या बैठकीपुर्वी व नंतरही मराठा समाजातील काही जणांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र उमेदवार ठरविण्यासाठी अजून काही दिवसाचा वेळ आहे. यामुळे कौन बनेगा जरांगे यांचा उमेदवार या चर्चेला जिल्हयात उधान आले आहे.