39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनक्रितीला हवा ‘दिसी ’ मुलगा

क्रितीला हवा ‘दिसी ’ मुलगा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या ‘क्रू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. होळीच्या दिवशी तिचा फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला ज्यामध्ये तिच्या कपाळावर सिंदूर दिसला, मात्र, खुद्द क्रितीने आता तिच्या भावी लाइफ पार्टनरबद्दल खुलासा केला आहे. क्रितीला एका मुलाखतीदरम्यान तिला कसा जोडीदार स्पष्ट सांगितले की, ती मला कुठलाही परदेशी मुलचे आकर्षण नाही तर मला देसी मुलगा हवा आहे. क्रितीला भारतीय मुलगा नवरा म्हणून आवडेल असे सांगितले तरी तिने कॅनेडियन अभिनेता रायन गोस्लिंगवर क्रश असल्याचे मान्य केले.

दरम्यान,या चित्रपटात तिने ‘फ्लाइट अटेंडंटस’ची भूमिका साकारली आहे. कू्रमध्ये क्रितीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही सर्वांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात क्रितीला बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री तब्बू आणि करीना कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, क्रिती पुढे म्हणाली की, तिला भारतीय मुलाशीच डेट करायला आवडेल. क्रितीने तिच्या भावी नव-याबाबत एक यादीच तयार केली आहे. ति म्हणते की मी भारतीय मुलगी असल्यामुळे मला भारतीय मुलगाच नवरा म्हणून हवा आहे. मात्र त्याला हिंदी आली पाहिजे कारण मला जास्त वेळ इंग्रजी बोलता येत नाही, असे क्रिती म्हणाली. शिवाय होणा-या नव-याला बॉलिवूडच्या टिपिकल हिंदी गाण्यावर नाचायला आले पाहिजे, असेही क्रितीने सांगितले. दरम्यान, क्रिती सध्या कू्रला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे खुश असून, ती आगामी प्रोजेक्टसवर काम करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR