33.1 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनदिग्दर्शक एस शंकर यांनी सुरू केली ‘नायक २’ ची तयारी

दिग्दर्शक एस शंकर यांनी सुरू केली ‘नायक २’ ची तयारी

मुंबई : अनिल कपूर स्टारर ‘नायक’ हा चित्रपट २००१ मध्ये आला होता. या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांचीच नाही तर समीक्षकांचीही मणे जिंकली होती. प्रेक्षक ब-याच दिवसांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या सिक्वेलची बातमीही समोर आली होती, ज्याला चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी फेक न्यूज म्हटले होते. दरम्यान नायक २ बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, त्यामुळे नायक २ बाबतची प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नायक चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले होते, तरा अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांनी दमदार खलनायकाची भूमिका केली होती. नायक रिलीज होऊन २३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षक ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान, अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर अनिल कपूरला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हापासून या चित्रपटाच्या सिक्वेलबाबतच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे.

नायक अनिलचा सर्वात यशस्वी चित्रपट
उल्लेखनीय आहे की १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शंकर यांच्या तमिळ चित्रपट ‘मुधलवण’ चा नायक हा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट अनिल कपूरच्या कारकिदीर्तील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. याआधी फायटर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद नायकचा सिक्वेल बनवणार असल्याची बातमी होती, मात्र नंतर चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी नायकच्या सिक्वेलच्या वृत्ताला खोटे ठरवले. नायकचे हक्क आपल्याकडे असून, आपल्याशिवाय हा चित्रपट बनू शकत नाही , योग्य वेळ आल्यावर त्यावर काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR