खासदार डॉ. काळगे, साळुंके यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली असून पावसाअभावी खरीप पिके करपून पूर्णपणे वाया गेली आहेत. या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी देवणी तालुक्यातील लासोना येथे थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन वाळलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संकटात सापडलेल्या शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शेतक-यांना धीर दिला.
पाहणीदरम्यान स्थानिक शेतकरी शिवाजी भोरे यांच्या शेतातील सोयाबीनच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पेरणीनंतर तब्बल ५० ते ५५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत, झाडे पार करपून गेली आहेत. प्रति एकर सुमारे ३५ हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच पडणार नाही अशी विदारक स्थिती निर्माण झाली असल्याचे शेतक-यांनी सांगितले. त्यातच मागील नुकसानीची मदत आणि विमा भरपाई अद्याप मिळाली नसताना आता नव्याने ओढवलेल्या दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, असा संतापही शेतक-यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच दिशा समितीच्या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच केंद्रीय कृषि मंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार असून राज्य सरकारने कोणतीही चालढकल न करता तात्काळ लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि शेतक-यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, आता कितीही पाऊस पडला तरी सोयाबीन पिकाची रास होणे शक्य नसून पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेजारच्या कर्नाटक सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ दुष्काळ जाहीर केला असताना, महाराष्ट्रातील सरकार केवळ तारखा सांगून वेळकाढूपणा करत आहे. शेतक-यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून जनावरांच्या चा-याचा आणि पाण्याचा प्रश्नही बिकट बनत आहे. शेतक-यांना व मजुरांना तात्काळ ठोस आर्थिक मदत न मिळाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयांवर धडक मोर्चे काढले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.   या दुष्काळ पाहणी दौ-याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, विविध संस्थांचे सभापती, लोकप्रतिनिधी तसेच  शेतकरी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news