29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeनांदेडखा.पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खा.पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नांदेड : प्रतिनिधी
लोकप्रतिनिधी म्हटले की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचे फोन येतात. त्यांच्या प्रत्यक्ष भेटून समस्या ऐकून घ्याव्या लागतात. जनतेच्या समस्यांचे समाधान करावे लागते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली आणि हदगाव येथील हजारो शेतक-यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने खा. हेमंत पाटील यांनी कृषी सहसंचालक विनय आवटे यांना जाब विचारला असता उलट त्यांनी खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सामान्यातील सामान्य जनतेच्या समस्यांना न्याय देण्याचे काम करत असतात. खा. हेमंत पाटील त्याला अपवाद नाहीत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० जानेवारी २०२४ रोजी पुणे येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मिटिंग झाली होती. या मिटिंगला कृषी सह संचालक विनय आवटे हे देखील उपस्थितीत होते. याच दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली आणि हदगाव तालुक्यातील शेतक-यांना पीक विमा देण्यासंदर्भात दिरंगाई का केली जाते, असा जाब विचारला, यावर समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. हेमंत पाटील यांनी धमकी दिली, असे म्हणत त्यांच्या विरोधात पुणे पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.

कृषी सहसंचालक विनय आवटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जीवाला हानी पोहोचवत कार्यालयाची तोडफोड करणार असे म्हटले आहे. मात्र जेव्हा सामान्य जनतेच्या भावना तीव्र असतात तेव्हा लोकप्रतिनिधींना देखील त्या भागाचे प्रतिनिधीत्व करत असताना समोरील अधिकारी यांना हक्काने बोलण्याचा किंवा एखादे काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा जाब विचारण्याचा अधिकार असतो. जाब विचारला म्हणजे धमकी देणे किंवा त्या अधिका-यास हानी पोहचविण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नसतो. परंतू कृषी सहसंचालक यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या बोलण्याचा बाऊ करत खा.हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून नेमके काय साधले हे त्यांनाच ठाऊक. प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांना लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कामासंदर्भात प्रश्न विचारूच नयेत का? असा देखील त्याचा दुसरा अर्थ निघतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR