40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरकचरा जाळण्यावर प्रतिबंधासाठी नेमली पथके

कचरा जाळण्यावर प्रतिबंधासाठी नेमली पथके

लातूर : प्रतिनिधी
‘३० ट्रॅॅक्टर कचरा जाळून केला नष्ट !’ या मथळ्याखाली ‘एकमत’ने दि. १९ मार्च रोजीच्या अंकात कचरा जाळण्यासंदर्भात सविस्तर वृत्तांत दिले होते. त्याची दखल लातूर शहर महानगरपालिकेने घेतली असून कचरा जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांचे क्षेत्रनिहाय पथके स्थापन केली आहेत.

लातूर शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. शहरात ज्या ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे त्या ठिकाणी कचरात पेटवण्यात येत आहे. बहुदा हा कचरा मुद्दामहून पेटवून कच-याचा साठा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्या ठिकाणाहून कचरा उचलून नेण्याचे प्रमाण कमी व्हावं याकरिता कचरा पेटवला जात आहे, अशी शंका यायला लागलेली आहे. विशेष म्हणजे दि. १८ मार्च रोजी शहरात अनेक ठिकाणी कचरा पेटवून देण्यात आला. सुमारे ३० ट्रॅक्टर कचरा जाळला गेला. सकाळी ६ ते १० ही वेळ लातूर शहरच स्म्शान झाल्यासारखी होती. कचरा धगधगत होता. धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे वायु प्रदुषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या संदर्भाने ‘एकमत’ने दि. १९ मार्च रोजीच्या अंकात सविस्तर वृतांत दिले होते. त्याची दखल लातूर शहर महानगरपालिकेने घेतली असून दि. २१ मार्च रोजी स्वच्छता निरीक्षकांचे क्षेत्रनिहाय पथके नेमली आहेत.

सध्या लातूर शहरात कचरा जाळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दररोजच घटत आहेत. त्यांचा शहराच्या वायू प्रदुशनावर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांचे क्षेत्रनिहाय पथक स्थापन करण्यात आले आहे. ‘अ’ क्षेत्राचे पथक प्रमुख स्वच्छता निरीक्षक शिवराज शिंदे आहेत. या पथकात अमजद शेख, प्रल्हाद शिंदे, गजानन सुपेकर, प्रदीप गायकवाड यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे. ‘ब’ क्षेत्रीय पथकाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक धोंडिबा सोनवणे हे असून त्याच्या पथकात शिवाजी कुटकर, श्रीकांत शिंदे, सुरेश कांबळे, ‘क’ क्षेत्रीय पथकाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक सुनिल कांबळे हे असून त्यांच्या पथकात रवि शेंडगे, महादेव फिस्के, सिद्धाजी मोरे यांचा समावेश आहे. ‘ड’ क्षेत्राच्या पथकाचे प्रमुख स्वच्छा निरीक्षक आक्रम शेख असून त्यांच्या पथकात हिरालाल कांबळे, देवेंद्र कांबळे, मनोहर शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR