33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरएक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात' मोहीमचे आयोजन ,भुईकोट किल्ला, महादेव मंदिर यांची स्वच्छता

एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीमचे आयोजन ,भुईकोट किल्ला, महादेव मंदिर यांची स्वच्छता

सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट किल्ला येथे एकदिवसीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

समितीचे . मिनेश पुजारे, . धनंजय बोकडे आणि . रोहन कलशेट्टी यांनी सहभागी युवकांना मोहिमेचा उद्देश सांगितला. सहभागी युवकांनी किल्ल्यावर स्वच्छता करत प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या. युवकांनी किल्ला परिसरात असलेल्या पुरातन अशा महादेव मंदिराची स्वच्छता केली. या मोहिमेत जिल्ह्यातील ६० युवक-युवती सहभागी झाले होते.या मोहिमेच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे . दत्तात्रय पिसे यांनी सहभागी युवकांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR