35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeलातूरखोट्या अफवा पसरवणा-यावर गुन्हे दाखल होणार

खोट्या अफवा पसरवणा-यावर गुन्हे दाखल होणार

लातूर : प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर हद्दीतील महादेव नगर, बाभळगाव रोड, रहेमानियाँ मस्जीद जवळील नगर मध्ये एका मनोरुग्ण अज्ञात व्यक्तीने महिलेचे कपडे कापले वरुन तसेच चोरींच्या घटनेवरून खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. असे कृत्य करणा-या व अफवा पसरवणा-यावर पोलीसांकडून गुन्हे दाखल केले जाणार असून खोट्या अफवा न पसरविणे बाबत लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन केले आहे.

गेल्या एक महिन्यापासून पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर हद्दीतील महादेव नगर, बाभळगाव रोड, रहेमानियाँ मस्जीद जवळील नगर मध्ये एका मनोरुग्ण अज्ञात व्यक्तीने महिलेचे कपडे कापले वरुन पो.स्टे.ला गुन्हा दाखल करून ०३ लोकांना पोलीसांनी अटक करून जेलमध्ये पाठविले आहे. तसेच चोराचा ड्रामा करणारे ०२ इसमांना अटक करून कार्यवाही केली आहे. तसेच रात्रीचे हातात रॉड, तलवारी व कत्ती असे घातक हत्यार घेऊन फिरणारे ०४ लोकांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने दररोज शहरात ५० पोलीस अंमलदार, २२ आर. सी.पी.चे जवान, ०५ पोलीस निरीक्षक व सपोनि दर्जाचे अधिकारी व सरकारी पोलीस वाहन १० असे रात्री २३.०० ते ०५.०० वा. पर्यंत शहरातील सर्व भागात नाईट पेट्रोलींग करीत आहोत. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक नगरात शांतता बैठक घेऊन, तसेच लाऊडस्पीकरवर अफवावर विश्वास ठेऊ नयेत म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक मुंडे यांनी म्हाडा कॉलनी, महादेव नगर, एस.ओ.एस., इकबाल चौक, मळवटी रोड, प्रबुध्द नगर, सिध्दार्थ सोसायटी, बाभळगाव रोड, कृपा सदन रोड, तुळजापूरे नगर, लिज्जत पापड रोड, नगरपालिका शाळा क्र. १६ या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून नागरीकांना एकत्र जमवून शांतता बैठक घेऊन चोरांचे अफवावर विश्वास न ठेवण्या बद्दल पोलीसा तर्फे अवाहन केले. तसेच प्रत्येक गल्लीत २० ते २५ मुलांना पोलीसचे कार्ड देऊन ग्राम सुरक्षा सदस्य करण्यात येत आहे.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श अचार संहिता चालू आहे. नागरीकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, कोणतेही व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करून काहीजन भफकेबाज प्रसिध्दी मिळावी या हेतूने व समाजात दहशत पसरवीत आहेत. खात्री न करता जुन्या बातम्या , फोटो, व्हिडिओ प्रसिध्द करीत आहेत. तसेच गल्लीतील खोडकर मुले स्वत:हा चोरा सारखा पोशाख करून हातात कत्ती, काठी घेऊन, कपडे काढून, तोंड बांधून व्हिडीओ करून टाकीत आहेत. तसेच यापुर्वी राज्यातील इतर शहरातील व भागातील जुने व्हिडीओची खात्री न करता टाकीत आहेत. ‘जनतेच्या/नागरीकांच्या सेवेत लातूर पोलीस २४ तास सर्तक आहेत, केंव्हाही डायल ११२ संपर्क साधावा त्यांना तात्काळ मदत मिळेल. तसेच नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये किंवा खोट्या अफवा पसरवू नये असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. यापुढे खोट्या अफवा पसरणावणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR