34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeक्रीडायुझवेंद्र चहलच्या आयपीएलमध्ये विक्रमी २०० विकेट पुर्ण

युझवेंद्र चहलच्या आयपीएलमध्ये विक्रमी २०० विकेट पुर्ण

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये युझवेंद्र चहलने मोठ्या पराक्रमाची नोंद केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने वर्चस्व गाजवलेले दिसत आहे. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात रोहित शर्माची विकेट मिळवून दिल्यानंतर संदीप शर्माने दोन विकेट्स पटकावल्या. त्यात युझवेंद्रने फिरकीवर मोठी विकेट घेऊन इतिहास रचला.

वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी यजमान मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद २० अशी केली होती आणि नंतर तो सामना सहज जिंकलाही होता. आता आरआरने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर एमआयच्या आशा होत्या आणि सूर्याने नेहमीप्रेमाणे काही अनपेक्षित फटके खेचले. संदीपने त्याच्या दुस-या षटकात सूर्यकुमारला ( १०) माघारी पाठवून मुंबईची अवस्था ३ बाद २० धावा अशी केली. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणे अपेक्षित असताना एमआयने मोहम्मद नबीला पाठवले. नबीने सहाव्या षटकात आवेश खानचे २,६,४,४,१ असे स्वागत केले. त्यामुळे मुंबईला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ४५ धावा करता आल्या.

कर्णधार संजू सॅमसनने आर अश्विन व युझवेंद्र चहल हा फिरकी मारा सुरू केला आणि आरआरला यश मिळाले. युझवेंद्रने त्याच्या पहिल्या षटकात नबीला(२३) कॉट अँड बोल्ड केले आणि आयपीएलमधील ही त्याची २०० वी विकेट ठरली. आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो ( १८३) व पियुष चावला ( १८१) असा क्रम येतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR