35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूर२८ उमेदवारांत लातूर लोकसभेची लढत

२८ उमेदवारांत लातूर लोकसभेची लढत

लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणुक आयोगाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानूसार ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघात दि. २२ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी ३१ जणांपैकी तीघांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने आता २८ उमेदवारांत ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, बहुजन समाज पार्टीचे विश्वनाथ आल्टे, भाजपाचे सुधाकर शृंगारे या राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांसह स्वराज्य शक्ती सेना पार्टीचे अतिथी सुर्यवंशी, राष्ट्रीय संत संदेश पार्टीचे अ‍ॅड. श्रीधर कसबेकर, बहुजन भारत पार्टीचे मच्छिंद्र कामंत, वंचित बहुजन आघाडीचे नरसिंगराव उदगीरकर, स्वराज्य सेना महाराष्ट्राचे बालाजी गायकवाड, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमॉक्रेटीक)चे भारत ननवरे, क्रांतीकारी जय हिंद सेनेचे भिकाजी जाधव, राष्ट्रीय बहुजन पार्टीचे लखन कांबळे, महा-राष्ट्र विकास आघाडीचे विकास शिंदे, बळीराजा पार्टीचे शंकर तडाखे, बहुजन मुक्ती पार्टीचे श्रीकांत होवाळ, अपक्ष अभंग सूर्यवंशी, अपक्ष अमोल हनमंते, अपक्ष उमेश कांबळे, अपक्ष दत्तू नरसिंगे, अपक्ष दीपक केदार, अपक्ष पपिता रणदिवे, अपक्ष पंकज वाखरडकर, अपक्ष पंचशील कांबळे, अपक्ष अ‍ॅड. प्रदीप चिंचोलकर, अपक्ष रघूनाथ बनसोडे, अपक्ष बालाजी बनसोडे, अपक्ष मुकेश घोडके आणि अपक्ष सुधाकर सूर्यवंशी हे २८ आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR