23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeक्रीडागुजरात सरकार मला त्रास देतंय

गुजरात सरकार मला त्रास देतंय

युसूफ पठाणचा गंभीर आरोप

बडोदा : वृत्तसंस्था
माजी क्रिकेटर आणि सध्याचे टीएमसीचे खासदार युसूफ पठाण यांनी गुजरात सरकार आपणाला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय या प्रकरणी ते आता हायकोर्टात पोहोचले आहेत. तर बडोदा येथील वादग्रस्त जमिनीबाबत पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने महापालिकेला नोटीस पाठवून प्रकरणाशी संबंधित स्पष्टीकरण मागितले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी २०१२ साली आपण संबंधित जागा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचे म्हटले आहे.

तसेच २०१४ मध्ये महापालिकेने वेगळा प्रस्ताव आणून राज्य सरकारकडे पाठवला होता असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मागील १० वर्षांपासून कोणतीच कारवाई का केली नाही, असा सवाल आता उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

विजयी झालो म्हणून मला त्रास
दरम्यान, या प्रकरणावर आपली बाजू मांडताना केवळ मी दुस-या पक्षातून खासदार झालो म्हणून मला त्रास दिला जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला. ते म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मी विजयी झालो. मात्र, मी दुस-या पक्षातून निवडून आल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. मागील १० वर्षांपासून या प्रकरणाची कसलीही चौकशी केली गेली नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर मला नोटीस पाठवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR