28.6 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रगुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

पुणे : प्रतिनिधी
शुभ मुहूर्त पाहून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील तर इंदापूर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील उमेदवारांनी विविध मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाची अजित पवार गट पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे .त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.

भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली तरी अद्याप काही जागांचा तिढा सुटला नाही कारण महायुतीमध्ये खडकवासला,वडगावशेरी या जागांबाबत एकमत झाले नाही या दोन्ही मतदार संघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे समजते तर भारतीय जनता पक्षाने देखील या जागासाठी मागणी केली आहे .

दरम्यान राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाची अजित पवार गट यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये विद्यमान आमदार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे आंबेगाव मतदार संघातून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,पिंपरीतून अण्णा बनसोडे, इंदापूर मधून दत्ता भरणे,जुन्नर मधून अतुल बेनके, मावळ सुनील शेळके हडपसर चेतन तुपे आणि खेड मधून दिलीप मोहिते यांचा समावेश आहे . यातील काही आमदार बाबत नाराजीचा सुर आहे तरीपण त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तीन दिवस झाले तरी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील उमेदवाराची यादी जाहीर झाली नाही पर्वती मतदार संघातून कोंग्रेस च्या वतीने माजी नगरसेवक आबा बागूल आग्रही आहेत पण हा मतदार संघ कोणत्या पक्षाकडे जाणार आहे हे नक्की झाले नाही त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे

राज्यातील शेतर्क­यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मनसेच्या वतीने शहरातील तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शेतकरी संघटनेच्या वतीने एकूण १५० जागा लढविण्यात येणार असून त्यातील नऊ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितली आहे. संघटनेच्या सात जागांचे उमेदवार जाहीर झाले त्यात इंदापूर मतदार संघाचा समावेश असणार आहे तसेच मनसेच्या वतीने खडकवासला,हडपसर,आणि कोथरूड मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR