32.2 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeलातूरगोवा निर्मित ८ लाखांचा अवैध विदेशी दारु जप्त

गोवा निर्मित ८ लाखांचा अवैध विदेशी दारु जप्त

लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूर जिल्हयाचे अधीक्षक तथा उप-अधीक्षक एम.जी. मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने दि. २३ एप्रिल रोजी रात्रौ २ वाजता लातूर जिल्हयात गोवा राज्य निर्मित अवैध मद्य वाहतूक विरोधात चाकूर विभाग यांनी गुणात्मक गुन्हा नोंद करुन दोन दुकाची वाहनावर कारवाई केली. यामध्ये समाधान ज्ञानोबा डावळे, वय-३०, रा. रेणापूर, शंकर बालाजी गालफाड, वय-२७, रा. पानगांव, ता. रेणापूर, जि. लातूर या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
सदर गुन्हयामध्ये १८० मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मित रॉयल स्टॅगच्या २३०४ बाटल्या (४८ खपटी बॉक्स्) तसेच १८० मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मित इंम्पेरियल ब्ल्युच्या ६२५ बाटल्या (१३ खपटी बॉक्स्) आणि १८० मिली क्षमतेच्या गोवा राज्य निर्मित मॅकडॉल नं. १ च्या ७२० बाटल्या (१५ खपटी बॉक्स) अशा १८० मिलीच्या ३६४९ गोवा राज्य निर्मित विदेशी दारुच्या बाटल्या (७६ बॉक्स) ५०० बुचे, १००० लेबल हे होंडा शाईन कंपनीच्या क्र. एमएच-१३-सीएफ ७७३९ व एमएच-२४-एव्ही-१४६७ या दोन दुचाकी वाहनासह ८ लाख ६ हजार ३०० रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त केला.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाकूर निरीक्षक यु. व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक एस. आर. राठोड, एस. के. वाघमारे, एन. डी. कचरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक-गजानन होळकर जवान अनिरुध्द देशपांडे, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषि चिंचोलीकर, हणमंत माने यांनी सहभाग नोंदविला. तसेच धाबा चालक हे अवैधमार्गाने दारु विक्री अथवा दारुसेवन करण्यास परवानगी देतात, त्याविरुध्द्र वरिष्ठांच्या आदेशान्वये विशेष कलमान्वये कार्यवाही सुध्दा सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR