23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरचाकूर रोटरी क्लबचे प्रांतपालाकडून कौतुक

चाकूर रोटरी क्लबचे प्रांतपालाकडून कौतुक

चाकूर : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब आँफ चाकूरच्या वतीने येत्या काळात रोटरीने ठरवून दिलेले सर्व प्रकल्प राबविण्यात येणार असून रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी क्लबचे कौतुक केले आहे. चाकूर क्लबला रोटरी क्लबच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांनी भेट देऊन झालेल्या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रोटरीचे सहप्रांतपाल डॉ.बी.आर.पाटील, डीजी.व्हिजीट सेक्रेटरी प्रमोद शिंदे, रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, सचिव विश्वनाथ एडके हे उपस्थित होते. यावेळी मान्यंवराचा सत्कार क्लबच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रांतपाल हेरकल यांनी रोटरी क्लबकडून राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमाची पाहणी केली व समाधान व्यक्त करून येणा-या काळात रोटरी लोकांच्या मदतीसाठीच कार्य करेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.पाटील ,शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी केले तर रोटरीकडून करण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा सचिव विश्वनाथ एडके यांनी घेतला.  सुत्रसंचलन व आभार सुरेश हाक्के यांनी मानले. यावेळी ज्ञानेश्वर चाकूरकर, डॉ.संजय स्वामी, शैलेश पाटील,अ‍ॅड.युवराज पाटील, डॉ.लक्ष्मण कोरे, शिवदर्शन स्वामी, डॉ.केदार पाटील, सुधाकर हेमनर, संगमेश्वर जनगावे, नारायण बेजगमवार, दिलीप शेटे,उध्दव सूर्यवंशी, अ‍ॅड. धनंजय चिताडे, अमोल येरवे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR