35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये १२ नक्षल्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये १२ नक्षल्यांचा खात्मा

नक्षल्यांच्या टॉप कमांडरला घेरले, जोरदार चकमक
गडचिरोली : प्रतिनिधी
छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून त्यामध्ये १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला या जंगलात घेरल्याची माहिती आहे.

बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा जवानांच्या संयुक्त पथकाला नक्षल विरोधी अभियानासाठी या परिसरात रवाना करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे. पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांंतील जवान नक्षलविरोधी अभियानात असून सकाळपासून चकमक सुरू आहे. एक बडा नक्षलवादी नेता या जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली.

जंगलात बडे नक्षलवादी
गांगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत. त्यानंतर या भागात कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR