20.2 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeलातूरजनतेला महागाईचे चटके देणा-या महायुतीला जागा दाखवा 

जनतेला महागाईचे चटके देणा-या महायुतीला जागा दाखवा 

लातूर : प्रतिनिधी
सणासुदीच्या दिवसात जनसामान्यांना महागाईचा चटका देणा-या भाजपा महायुतीला जागा दाखविण्याकरीता काँग्रेस महाविकास आघाडीला भरभरुन पाठींबा द्या, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
औसा तालूक्यातील कवठा (केज), भेटा, अंदोरा, जायफळ येथे दि. २७ रोजी महिला संवाद बैठकीचे आयेजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनीताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, प्रेमनंदाताई कदम, शितलताई गोरे, पल्लवीताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, भाजपा महाविकास आघाडीने आजपर्यंत जे जे निर्णय घेतले. ते सर्व निर्णय त्यांच्याच अंगलट आलेले आहेत. भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे व  राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात कधीच एकवाक्यता दिसुन आली नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या  हिताचे त्यांच्याकडून काहींच झाले नाही. भंपकबाजी, जाहिरातबाजी, खोट्या घोषणा हेच त्यांचे काम राहिले. या उलट काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात लोकहिताच्या कामांवर भर होता. शेतकरी, शेतमजुर, कामगार ते सर्व सामान्य व्यक्ती हे सर्वजण सुखी होते.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार धिरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत लातूर ग्रामीण मतदारसंघााचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. सर्वाधिक विकास निधी त्यांची खेचून आणला, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, आमदार धीरज देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक योजना राबवले आहेत. त्यात शेतक-यांसाठी बीन व्याजी पाच लाख रुपये दिले, बचत गट महिलांना नवीन उद्योगासाठी कर्ज, उच्च शिक्षणासाठी कर्ज, मुलींच्या लग्नासाठी शुभमंगल योजना अशा अनेक योजना जिल्हा बँकेच्या मार्फत गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी राबविल्या जातात.  गेल्या दहा वर्षात महायुती सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून सर्व जनतेची फसवणूक केले आहे. त्यामुळे आता महायुती सरकारच्या कुठल्याही जाहिरातीवर व त्यांच्या आश्वासनावर विश्वास न ठेवता आपल्या अडीअडचणी जाणून घेणा-या व आपल्या सुखात दु:खात साथ देणारे आपले आमदार धीरज देशमुख यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन केले.
सौ. दीपशिखा धीरज देशमुख म्हणाले, २० नोव्हेंबरला मतदान स्वरुपात आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा एकदा मतदारांनी आशिर्वाद द्यावा. महायुती सरकारने दैनंदिन जीवनात लागणा-या अनेक वस्तूवर जीएसटी लावून अधिकचा दर वाढवला आहे. महायुती सरकारने मागील पाच महिन्याच्या कालावधीत अनेक वस्तूवर अधिकची जीएसटी लागू केली आहे.  महायुती सरकाने घरगुती वस्तूचे दर वाडवून सामान्याची लूट करीत आहे. आज खाद्यतेल १४० ते १५० रूपये, खोबर १५० रूपये, तुरदाळ १७०, मुगदाळ १३०, चणादाळ १०५ ते ११० रूपये केले आहे. हे दर वाढवून या सरकाने लाडकी बहिन योजना आणली आणि महिलांना पंधराशे रूपये देत आहे. त्यामुळे महायुती सरकार हे लबाडांचे सरकार आहे. या सरकारवर विश्वास न ठेवता आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन केले.
यावेळी सुनिता घुट्टे, आयोद्याबाई होदाडे, रुक्मिणीबाई मिसाळ, शांताबाई पवार, उषाबाई घुट्टे, अनिता पवार, जलसाबाई घुट्टे, हिराबाई घुट्टे, राधाबाई गोरे, गोलूबाई जाधव, आशाबाई जाधव, सुधामती घुटे, शोभा पवार, पार्वती कसबे, सुमनबाई मिसाळ, पार्वतीबाई घुट्टे, हिरकणबाई गोरे, गौरवी जाधव, प्रभावती शेळके, मीरा सरवदे, सारिका कांबळे, पंचशीला कांबळे, कुमारी माने, जयश्री शेळके, महानंदा पांचाळ, दैवशाला शेळके, अनिता लोकरे, शीला भोकरे, अर्चना गायकवाड, सुमन माने, संध्या जाधव, वंदना तरकसे, फरजाना पठाण, रुकसाना पठाण, गोरीबी पठाण, आलिशा पठाण, सुलताना शेख, गौसिया पठाण, शमीम पठाण, अंजुम शेख, नजराना शेख, नाझिया शेख, सुमय्या शेख, अफरीन शेख,  लैला पठाण, जुलेखा पठाण, नंदूबाई भोंग, अपूर्णा  भोंग, मनीषा भोंग, साधना माचवे, सुंदर माचवे, प्रियंका भोंग, मंगलबाई जंगले, शितल भोंग, आम्रपाली जोगदंड, मनीषा जोगदंड, कल्पना माचवे, पल्लवी जगताप, किसकिंदा भोंग, मंदाबाई भोंग, कांचन नंदराम, गोकर्णा नंदराम, अशा नंदराम यासह आदी महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गावकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR