21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeलातूरलातूर शहरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

लातूर शहरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

लातूर : गावठी कट्ट्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना लातुरातील सीतारामनगर येथे सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले(३८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातूर शहरातील सीतारामनगर येथे भाड्याने वास्तव्याला असलेल्या बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने देशी कट्टा (रिव्हॉल्व्हर) खोलीत ठेवल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी खोलीवर भेट देऊन पाहणी केली असता, देशी कट्टा आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता, तो देशी कट्टा गणेश शेंडगे (वय ३०, रा. एलआयसी कॉलनी, लातूर) याचा असून, त्याने तो माझ्याकडे ठेवण्यासाठी दिला होता, असे सांगितले.

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह गणेश शेंडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप सागर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले, बालाजी कोतवाड, शिंदे, पांगळ यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR