25.8 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeलातूरजिल्हाधिका-यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

जिल्हाधिका-यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

लातूर : प्रतिनिधी
जागतिक दृष्टीदान दिन आणि आपला वाढदिवस यांचे औचित्य साधून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नेत्रदानाचा संकल्प करून एक प्रेरणादायी पाऊल उचलले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या दयानंद सभागृहात आयोजित नेत्रदान संकल्प अभियान कार्यक्रमात त्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने संकल्प पत्र भरून नेत्रदानाचा दृढनिश्चय जाहीर केला. यावेळी त्यांनी उपस्थित महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यात सहभागी होण्याचे हृद्य आवाहन केले.
जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पाठक यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्याची गरज आणि कार्यपद्धती याबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारीह्यायंत क्षीरसागर, नेत्र चिकित्सा अधिकारी आर. पी. वाघमारे, संकेत लंपाटे, विनायक सोनटक्के आणि लातूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या अभियानामुळे समाजात नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होऊन अनेकांना प्रेरणा मिळेल, असा ठाम विश्वास श्रीमती ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR