जुन्नरमध्ये गाणी लावण्यावरून वाद ; तुळजाभवानी कला केंद्रात गोळीबार 

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील १४ नंबर परिसरातील तुळजाभवानी कला केंद्र येथे गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबाराच्या घटनेत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवार (दि. ८) पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात फिरोज कादिर शेख (वय ३१, रा. ओतूर) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ नंबर येथील तुळजाभवानी कला केंद्र परिसरात रात्रीच्या सुमारास गाणी लावण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गोळीबारात फिरोज शेख जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती व जखमेचे स्वरूप याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, गोळीबार करणारे तरुण चाकण परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गोळीबारानंतर संबंधित तरुण घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे.

गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, किती जणांचा या घटनेत सहभाग होता, गोळीबारासाठी कोणते शस्त्र वापरण्यात आले तसेच जखमी तरुणाला गोळी नेमकी कुठे लागली, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
घटनास्थळावरील पुरावे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक देखील दाखल झाले आहे. या पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर १४ नंबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news