21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१ ग्रंथांचा आज लोकार्पण सोहळा 

ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१ ग्रंथांचा आज लोकार्पण सोहळा 

लातूर : प्रतिनिधी
पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती, गुजरातच्या भारतीय शिक्षणावर आधारित ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१  ग्रंथांचा लोकार्पण सोहळा शनिवारी दि. ८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या संयुक्त्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथांचे राष्ट्रव्यापी लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुमतीताई काटदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमास संघाच्या देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव यांचीही उपस्थिती असणार आहे. दयानंद सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह हेमंत वैद्य, श्री केशवराज शैक्षणिक संकुल, लातूरचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, कार्यवाह शैलेश कुलकर्णी व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष, विश्वस्त मंडळ  लक्ष्मीनारायण लाहोटी, अध्यक्ष संचालक मंडळ शैलेशकुमार लाहोटी, सचिव अ‍ॅड. आशिष बाजपाई, राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचे चेअरमन आनंद लाहोटी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR