29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeनांदेडट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

वडील ५० फूट पुलाखाली फेकल्या गेले नांदेड जिल्ह्यातील घटना

नांदेड : नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावर असना पुलावर दुचाकीवरून जाणा-या बाप-लेकाचा समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दाजीबा शंकरराव गाढे (६५), गोपीनाथ दाजीबा गाढे(४०) अशी मृतांची नावे आहेत. अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे यांना मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे हे आपल्या वडीलांना (कॅन्सरवर उपचार सुरू होते) तपासणीसाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात घेऊन जात होते. दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नांदेड येथे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड-अर्धापूर मार्गे भरधाव जाणा-या आयशरची (क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात ६५ वर्षीय दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फुट उंचीवरून खाली पडले. तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला.

सदर अपघाताची माहिती मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिस यांना दिली. राजकुमार व्यवहारे, राजीव धाडवे, नईम शेख, रंिवद्र साकरकर, जसप्रीत शाहू, वसंत शिनगारे, नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे व विमानतळ पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघाही कर्त्या पितापूत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR