22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीट्रक- पिकअपच्या समोरासमोरील धडके १ ठार, २ जखमी

ट्रक- पिकअपच्या समोरासमोरील धडके १ ठार, २ जखमी

परभणी : पाथरी रोडवरील किन्होळा पाटी जवळ ट्रक आणि पिकअप वाहनाच्या भिषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जखमी झाली आहेत. ही घटना बुधवार, दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परभणीहून ट्रक क्रमांक केएल ५० एल ३७११ पाथरीकडे जात होता. तर पिकअप क्रमांक एमएच १६ सीडी ३१२९ या क्रमांकाचा पिकअप पाथरीहून भाजीपाला घेवून परभणीकडे येत होता. सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने किन्होळा पाटीवर आली असता त्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात पिकअपचा चालक अतिश गणेश सोळंके (वय २०) रा. धोंडे पारगाव ता. अहमदनगर जागीच ठार झाला. या अपघातात विलास गोरख साळवे व अन्य एक जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक डोंगरे, पोउपनि. तावडे, सपोउपनि. कनाके, महामार्ग सपोनि. अर्चना करपुडे, पोउपनि. नाटकर, पोलिस अंमलदार संजय पुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याला बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR