डिलिमिटेशन विधेयकाला केंद्राची मंजुरी

दुरुस्तीसह मान्यता, लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढणार
आता २५ वर्षांसाठी
डिलिमिटेशन गोठवणार
३३ टक्के महिला आरक्षणाचा प्रस्ताव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. यामध्ये विविध राज्यांमधील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यांमध्ये जागांच्या वाटपाची सध्याची व्यवस्था पुढील २५ वर्षांपर्यंत म्हणजेच २०५१ पर्यंत कायम राहील.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा मिळावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केला असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत हे बिल आणले जात आहे, त्यावेळी सर्व सहकार्य मिळावे, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्यांसोबत संवाद करून शंका दूर करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मोदी सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ही बैठक सुमारे ४० मिनिटे चालली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजावर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत डिलिमिटेशन बिल (परिसीमन विधेयक) मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त महिला आरक्षणाशी संबंधित एक दुरुस्तीही मंजूर करण्यात आली. लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबर रोजी तर राज्यसभेची बैठक २ डिसेंबर रोजी बोलावण्यात आली. दिल्ली पातळीवर आणि राज्य सरकारच्या पातळीवरती घडामोडींना वेग आला आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क केला असल्याची माहिती समोर आली.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाशी आता भाजपचे वरिष्ठ नेते संपर्क साधत आहेत. याआधी देखील संपर्क करण्यात आला होता, हे विधेयक पास व्हावे, यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत तर हे विधेयक पास करताना कोणकोणते पक्ष पाठिंबा देऊ शकतात, त्यांना संपर्क केला जात आहे तर या विधेयकाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्याला पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

यासाठी संसदेचे चार दिवसीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता जात आहे. हे स्वतंत्र हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील भाग आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे तर २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे तर ३ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

अद्याप अधिवेशनाच्या
कामकाजाचा अजेंडा नाही
सरकारकडून अद्याप अधिवेशनाचा अधिकृत कामकाजाचा अजेंडा जाहीर झालेला नाही. अधिवेशन बोलावण्याच्या पद्धतीवरून घटनादुरुस्ती विधेयक आणण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत यावरून दिसून येत आहेत.

आगामी काळात
समीकरणे बदलणार
लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या वाढवून ८५० करण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. आता सर्व राज्यांमध्ये जागा वाढविण्याच्या नव्या सूत्रामुळे राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

दक्षिणी राज्यांच्या
चिंता दूर करणार?
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून दक्षिण भारतातील राज्यांनी चिंता व्यक्त केली होती. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलेल्या दक्षिणेकडील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. हीच बाब लक्षात घेऊन सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा पर्याय पुढे आल्याचे मानले जात आहे.

महिला आरक्षण
विधेयकात फेरबदल?
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या उद्देशाने सरकार महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये लोकसभेत संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक, २०२६ मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता नव्या बदलांसह विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news