25.9 C
Latur
Wednesday, June 25, 2025
Homeलातूरडेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपा ऍक्शन मोडवर

डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपा ऍक्शन मोडवर

लातूर : प्रतिनिधी
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्त्वाचा भाग म्हणून लातूर शहरामध्ये अबेटिंग मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील २०३, आशा स्वयंसेविका ४६, आरोग्य सेविका आणि १६ आरोग्य कर्मचारी पुरुष यांचा सहभाग असणार आहे. या मोहिमेमध्ये घरोघरी जाऊन डास उत्पत्तीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून आढळलेली डास उत्पत्तीचे ठिकाणी शक्यतो नष्ट करणे किंवा तसे शक्य नसल्यास त्या पाण्यामध्ये औषध टाकने, प्रसंगी वारंवार डास उत्पत्तीचे ठिकाणे आढळून येणा-या ठिकाणी संबंधितांना सूचना पत्र देणे, ही कामे केली जाणार आहेत. यासोबतच शहरामध्ये डासांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रसंगी धूरफवारणी देखील केली जाणार आहे.
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मिना यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर शहरामध्ये अबेटिंग मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी देखील डेंगी आजाराच्या प्रतिबंधाकरिता वैयक्तिक पातळीवरून सक्रिय सहभाग नोंदवून आपला खारीचा वाटा उचलावा आणि या राबवण्यात येणा-या अबेटिंग मोहिमे करिता आपल्या घरी किंवा परिसरात येणा-या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करण्याचे आवाहन लातूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
डासांच्या चाव्याव्दारे संक्रमण डेंग्यू विषाणू संक्रमित मादी डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो, प्रामुख्याने एडीस एजिप्ती डास. एडीस वंशातील इतर प्रजाती देखील वाहक म्हणून काम करू शकतात, परंतु त्यांचे योगदान सामान्यत: एडीस एजिप्तीपेक्षा दुय्यम असते. डेंग्यू पसरवणारे डास दिवसा सक्रिय असतात. त्यामुळे शक्य तितके शरीर झाकणारे कपडे, दिवसा झोपण्यासाठी मच्छरदाण्या वापराव्यात, तर कीटकनाशक फवारलेल्या जाळ्या वापराव्यात. पर्यावरणीय व्यवस्थापन आणि सुधारणांद्वारे डासांना अंडी घालणा-या अधिवासात प्रवेश करण्यापासून रोखणे, घनकच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आणि पाणी साठवू शकणारे कृत्रिम मानवनिर्मित अधिवास काढून टाकणे, आठवड्यातून एकदा घरगुती पाणी साठवणूक भांडी झाकणे, रिकामे करणे आणि स्वच्छ करणे, बाहेरील पाणी साठवण्याच्या भांड्यांमध्ये योग्य कीटकनाशके वापरणे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR